"हिंदू समाज सडलेला" असं म्हणणाऱ्या शरजीलला एल्गार परिषदेचा पाठिंबा

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

 

  • एल्गार परिषदेच्या आयोजकांकडून उस्मानीची पाठराखण
  • एल्गार परिषदेच्या भूमिकेचा ब्राह्मण महासंघाकडून निषेध
  • आंबेडकरांचाही एल्गार परिषेदच्या आयोजकांवर हल्लाबोल

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीची एल्गार परिषदेच्या आयोजकांनी जोरदार पाठराखण केलीय. एल्गारच्या या भूमिकेचा ब्राह्मण महासंघानं निषेध केलाय

शरजील उस्मानी यानं एल्गार परिषदेत हिंदूसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि ऐन थंडीत राज्यातील राजकीय वातावरण तापलं. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उस्मानीवर कठोर कारवाई मागणी झाली. त्यानंतर शरजीलवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरजीलविरोधात वातावरण असताना एल्गार परिषदेकडून मात्र त्याची पाठराखण करण्यात येतंय

एल्गार परिषदेच्या भूमिकेचा ब्राह्मण महासंघाकडून निषेध केला. शर्जील उस्मानीवर कारवाई झालीच पाहिजे अशी भुमिका ब्राह्मण महासंघानं घेतलीय.

दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी एल्गार परिषदेच्या आयोजनावरच सवाल उपस्थित केला. मी एल्गार परिषदेला महत्त्व देत नाही अशी खोचक टीका त्यांनी केलीय

शर्जील उस्मानीच्या वक्तव्यानंतर उठलेले  वादळ अद्याप शमलेलं नाही. त्यातच एल्गार परिषदेच्या आयोजकांनी शर्जीलची पाठराखण केल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह दिसतायेत


संबंधित बातम्या

Saam TV Live