शशी थरूर यांच्या अडचणीत वाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 डिसेंबर 2019

तिरुअनंतपुरम:  काँग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.तिरुअनंतपुरमच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी शशी थरूर यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. शशी थरूर यांच्या 'द ग्रेट इंडियन नॉवेल' या पुस्तकातील मजकुरावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुस्तकातून हिंदू महिलांचा अवमान केल्याचा आरोप शशी थरुर यांच्यावर करण्यात आला आहे.  शनिवारी याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी शशी थरुर किंवा त्यांच्यावतीने कुणीही वकील कोर्टात हजर नव्हते. त्यामुळे कोर्टाने हजर न राहिल्याने शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी साहित्य अकादमीने इंग्रजीसाठी शशी थरूर यांना 'एन एरा ऑफ डार्कंनेस' साठी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

WebTittle :: Shashi Tharoor's problems increase

संबंधित बातम्या

Saam TV Live