भाजप नेते म्हणतात, आता कळलं खरा 'फेकू' कोण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : 'पप्पू' कोण आहे आणि खरा 'फेकू' कोण बनले आहे, हे साहेब आपण सांगाल का? आमच्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला करिष्मा लोकांना दाखवून दिला. जर टाळी कर्णधाराला मिळत असेल तर मग शिव्याही त्यालाच मिळाव्यात, अशा शब्दांत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपकडून वारंवार 'पप्पू' म्हटले जात होते. त्यावर आज शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटवरून सांगितले, 'पप्पू' कोण आहे आणि खरा 'फेकू' कोण आहे, हे साहेब आपण मला सांगाल का? आमच्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा आपला करिष्मा लोकांना दाखवून दिला. जर टाळी कर्णधाराला मिळत असेल तर मग शिव्याही त्यालाच मिळाव्यात.

दरम्यान, ''आम्ही राहुल गांधी आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. तसेच त्यांच्या टीममधील हुशार रणदीप सुरजेवाला आणि शक्तीसिंहगोहिल यांच्यासह सर्वांचे अभिनंदन'', असेही ते म्हणाले.

Web Title: Shatrughan Sinha Criticizes Narendra Modi

संबंधित बातम्या

Saam TV Live