Video | भारीच की! शेफाली वर्मा टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत अव्वल स्थान पटकाविले आहे. सुझी ऑक्टोबर 2018पासून अव्वल स्थानावर होती. तिचे सध्या 750 गुण आहेत तर शेफालचे 761 गुण आहेत. 

दुबई - भारताची तडाखेबाज फलंदाज शेफाली वर्मा हिने विश्वकरंडकाच्या पहिल्या सामन्यापासून सर्वांची मने जिंकायला सुरवात केली. तिचे उत्तुंग फटके, तिच्या फटकांमधली ताकद, तिची चेंडू सहज सीमारेषेपार करण्याची कला या सगळ्यामुळेच तिचे क्रिकेटविश्वातून कौतुक होत आहे. अशातच आता तिने आणखी एक भन्नाट कामगिरी केली आहे. 

 

पाहा व्हिडीओ - 

आयसीसी टी20 क्रमवारीत शेफालीने अव्वल स्थान पटकाविले आहे. विश्वकरंकातील चार सामन्यांमध्ये तिने 161 धावा केल्या आहेत. मिताली राजनंतर टी20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविणारी ती केवळ दुसरी फलंदाज ठरली आहे. 

पाहा व्हिडीओ - WEB विशेष | पाणीपुरी विकूनही 'यशस्वी' होता येतं

 

पाहा लेडी सेहवाग अशी ओळख असलेल्या शेफालीचे सॉलिड सिक्सर - 

 

तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत अव्वल स्थान पटकाविले आहे. सुझी ऑक्टोबर 2018पासून अव्वल स्थानावर होती. तिचे सध्या 750 गुण आहेत तर शेफालचे 761 गुण आहेत. 

 

विरेंद्र सेहवागनेही शेफालीचं कौतुक केलंय. 

 

shefali verma first rank t20 world cup india cricket batsman virendra sehwag india virat sachin dhoni kohli icc bcci

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live