शी जिनपिंग भारत दौऱ्यावर, स्वागताची जोरदार तयारी  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

चेन्नई - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या स्वागतासाठी इंग्रजी आणि चिनी भाषेतील अक्षरे मुलांनी साकारली.
नवी दिल्ली - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे शुक्रवारी (ता. ११) भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याबरोबर अनौपचारिक बैठक होणार आहे. तमिळनाडूतील मामल्लपुरम येथे हे दोन्ही नेते भेटणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी तयारी पूर्ण झाली आहे. राणी एलिझाबेथ यांच्या १९९७ च्या दौऱ्यानंतर प्रथम एवढा मोठा कार्यक्रम येथे होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चेन्नईत सुमारे सात हजार विद्यार्थी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून मोदी व जिनपिंग यांना अभिवादन करणार आहेत. सुरक्षेसाठी तब्बल नऊ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. या भेटीच्या पाश्‍तुर्श्वभूमीवर कीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. शिवाय, ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून सागरी किनारपट्टीवर २४ तास लक्ष ठेवण्यात येणार आहे. मामल्लपुरम हे चेन्नईपासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीच्या दोन दिवसाआधीच येथील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. जिनपिंग यांच्याबरोबर २०० सदस्यांचे शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ‘एअर चायना’चे विमान तीन दिवसांपूर्वीच भारतात पोचले असून, त्यातून ‘बुलेटप्रूफ’ चार गाड्या आल्या आहेत. दौऱ्यात चीनचे अध्यक्ष आणि त्यांच्या लवाजम्यात या गाड्यांचा वापर होईल.

Web Title: shi jinping welcome in india preparation
 
संबंधित बातम्या

Saam TV Live