रशियन स्पुटनिक-व्ही लसीचा साठा आज भारतात येण्याची शक्यता

Sputnik V
Sputnik V

नवी दिल्ली : स्पुटनिक-व्ही लवकरच भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सामील होणार आहे. आयामुळे या कोरोना साथीच्या आजाराविरूद्धच्या लढाईत देशाला जोरदारपणे ''कमबॅक" करण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Shipments of Russian Sputnik V vaccine are expected to arrive in India today

शनिवारी कोरोना Corona व्हायरस रोगाविरूद्ध रशियन Russia निर्मित लस स्पुटनिक-व्ही Sputnik-V चा पहिली डोस भारताला मिळणार आहे. देशात कोविड -१९ आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आणि गेल्या नऊ दिवसांपर्यंत दररोज ३००००० पेक्षा जास्त नवीन संसर्ग नोंदले देले आहेत या लसीचे पहिले डोस शनिवारी पाठविण्यात येतील, असे . जागतिक स्तरावर स्पुटनिक व्ही चे मार्केटिंग करणार्‍या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे प्रमुख किरील दिमित्रीव्ह यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते.

स्पुटनिक-व्ही  या महिन्यात तज्ञ समितीने मंजूर करण्यात आली आहे. स्पुतनिक-व्ही लवकरच भारताच्या लसीकरण कार्यक्रमात सामील होईल.  शनिवारी भारताने आपल्या लसीकरण मोहिमेच्या तिसर्‍या टप्प्यातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लसींना सुरुवात केली आहे. Shipments of Russian Sputnik V vaccine are expected to arrive in India today

आरडीआयएफने Russian Direct Investment Fund या वर्षाच्या सुरुवातीला पाच आघाडीच्या देशांतर्गत उत्पादकांशी ८५० दशलक्षपेक्षा जास्त डोससाठी करार केले आहेत. भारतातील उन्हाळ्यापर्यंत महिन्यात ५० दशलक्षापेक्षा जास्त डोस उत्पादन करण्याचे लक्ष्यदेखील ठेवले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन Vladimir Putin यांच्याशी चर्चा केली होती.

तुर्कस्तान, चिली आणि अल्बानिया हे इतर ६० देशांनी स्पुटनिक-व्हीला मान्यता दिली आहे. ही लस पुतीन आणि रशियासाठी एक वैज्ञानिक आणि राजकीय विजय आहे. ही लस जगातील सर्वोत्कृष्ट कोविड -१९ लस आहे, असा दावा स्पुटनिक-व्ही च्या उत्पादक असलेल्या रिसर्च सेंटरने  केला आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com