कोरोनावर मात करुन घरी जाताना दिला जातोय 'आॅक्सिजन प्लँट'

रोहिदास गाडगे
मंगळवार, 11 मे 2021

पुणे जिल्ह्याच्या  शिरुर तालुक्यातील एका कोविड सेंटर मध्ये अनोखा उपक्रम राबवला जात आहे. एका कोविड सेंटरमधून कोरोनाबधित रुग्ण बरा होऊन घरी परतताना त्याला दिला जातोय ऑक्सिजन प्लांट....

शिरुर : पुणे Pune जिल्ह्याच्या  शिरुर तालुक्यातील एका कोविड सेंटर मध्ये अनोखा उपक्रम राबवला जात आहे. एका कोविड सेंटरमधून Covid Centre कोरोनाबधित रुग्ण बरा होऊन घरी परतताना त्याला दिला जातोय ऑक्सिजन Oxygen प्लांट....आता तुम्ही म्हणत असाल ऑक्सिजन प्लांट...हो ऑक्सिजन प्लांट म्हणजे डिस्चार्ज देते समयी जाणवत असलेली ऑक्सिजनची कमतरता ओळखून प्रत्येक रुग्णाला घरी ऑक्सिजन मिळावा व इतरांना मिळावा यासाठी एक झाड भेट देऊन जगण्याची उमेद देत आहेत.

हे आहे शिरुर Shirur तालुक्याच्या पिंपळे जगताप येथील कोविड सेंटर..... शिरुर तालुक्याच्या पिंपळे जगताप येथे शिरुरचे आमदार अशोक पवार व राव लक्ष्मी फांउडेशनच्या सौजन्याने युवा उद्योजक  प्रफुल्ल शिवले व गणेश शेळके यांच्या माध्यमातून २०० बेडचे सुसज्ज असे सेंटर पिंपळे जगताप येथे उभारण्यात आले आहे.

दृश्यमच्या काॅपीराईटचा वाद उच्च न्यायालयात

यामध्ये तज्ञ डाॕक्टरांच्या टिम सह दोन अब्युलसन ,अत्याधुनिक यंञसामुग्री उभारण्यात आली आहे. मात्र कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडताना आॕक्सिजनचे महत्त्व ओळखून प्रत्येकाला घरी जाताना एक झाड भेट दिले जात आहे.यामुळे प्रत्येक घरी जाणारा माणूस झाड लावेल आणि ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

हे देखिल पहा - 

अनेक कोविड सेंटर मध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहिले  असतील.परंतु या कोविड सेंटर मध्ये खर तर रुग्णांना जेवण,फळे  नित्यनियमाने रोज दिले जाते,तसेच योगा व मनोरंजकसाठी मोठी स्क्रिन लावण्यात आली आहे त्यातच प्रत्येक रुग्नाचा वाढदिवसही केक कापुन याठिकाणी साजरा केला जातोय यामुळे रुग्ण सुद्धा न घाबरत येथे राहून उपचार घेत ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत.

सामाजिक बांधिलकी ओळखून सुरू झालेल्या या कोविड सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत उपचार केले जातात तर कोरोना विरुध्द लढण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन सल्ला देत जगण्याची नवी उमेद नवी दिशा दिली जाते त्यामुळे असे कोविड  सेंटर रुग्णांसाठी एक दिलासादायक  वातावरणच म्हणावे लागेल.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live