ट्‌विटर अकांऊटवरून दोन महिला शिवसेना नेत्यांना आली जीवे मारण्याची धमकी..

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे आणि प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी आशिष केआर द्विवेदी या ट्‌विटर हॅंडलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

@ASHISHKRDW2 या ट्‌विटर अकांऊटवरून शीतल म्हात्रे आणि प्रियंका चतुर्वेदी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आशिष केआर द्विवेदी असं या धमकी देणाऱ्याचं नाव आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 4.30 च्या सुमारास त्या ट्विटर अकाऊंट तपासत असताना त्यांना ट्विटरवरुन धमकीवजा मॅसेज दिसला. यामध्ये त्यांच्याबरोबर शिवसेना प्रवक्त्या आणि नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही ट्विटरच्या माध्यामातून जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज आलाय. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. 

मुंबई पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपीवर कलम 506 अतंर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शीतल म्हात्रे या दोन वेळा दहिसर परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत, तर प्रियंका चतुर्वेदी यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडली जात असताना त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Webtitle : shital mhatre and priyanka chaturvedi gets life threatening message on twitter

संबंधित बातम्या

Saam TV Live