नाणार रिफायनरीचे बॅनर शिवसेनेने जाळले

नाणार रिफायनरीचे बॅनर शिवसेनेने जाळले

राजापूर - तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपप्रणित शासन आग्रही असल्याचे चित्र आहे. सत्तेतील सहकारी मित्रपक्ष शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज रिफायनरीवर हल्लाबोल केला. शहरातील एसटी स्टॅण्ड परिसरामध्ये असलेले रिफायनरीचे समर्थन करणारे बॅनर शिवसेनेने फाडून आणि जाळले. तसेच कोणत्याही स्थितीमध्ये नाणारमध्ये रिफायनरी होवू देणार नसल्याचा पुन्हा एकदा इशारा दिला. यावेळी आमदार साळवींसह मोठ्या संख्येने जमा झालेल्या शिवसैनिकांनी रिफायनरी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.   

नाणार येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला असून रिफायनरी रद्द करावी, अशी मागणी सेनेकडून केली जात आहे. त्याबाबत विधानसभेमध्ये सेनेकडून आपली रिफायनरीबाबतची बाजूही मांडली गेली आहे. रिफायनरीबाबतच्या सेनेच्या भूमिकेबाबत प्रकल्पग्रस्तांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

दुसर्‍या बाजूला शिवसेनेसह प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्प रद्द करावा अशी मागणी रेटून धरली जात आहे. आज आमदार साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रिफायनरीवरून होत असलेली कोंडी फोडताना प्रकल्पविरोधात जोरदार हल्लाबोल केला. शहरातील एसटी आगाराच्या परिसरामध्ये रिफायनरी समर्थन करणारा फलक लावण्यात आला आहे. आमदार साळवी यांनी  शिवसैनिकांसमवेत रिफायनरी समर्थनार्थ लावण्यात आलेला फलक फाडून जाळून टाकले. शिवसैनिकांनी रिफायनरी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. 

Web Title: Shiv Sena burned the refinery banner

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com