मुंबई महापालिका स्थापत्य समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे दत्ता पोंगडे

साम टीव्ही ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

महानगरपालिकेच्‍या स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्ष पदासाठी (२०२१-२०२२) आज पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेचे Shivsena दत्‍ता पोंगडे हे १७ मते मिळवून विजयी झाले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या स्‍थापत्‍य समिती (शहर) अध्‍यक्ष पदासाठी (२०२१-२०२२) आज पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेचे Shivsena दत्‍ता पोंगडे हे १७ मते मिळवून विजयी झाले.  Shiv Sena Datta Pongde Became President of Sthapatya Samiti of BMC 

महानगरपालिका मुख्‍यालयातील सभागृहात झालेल्‍या या निवडणुकीमध्‍ये श्री. पोंगडे यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार श्रीमती रिटा मकवाना (भाजप BJP) यांना १० मते मिळाली. एकूण ३६ सदस्‍यांपैकी २८ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्‍यातील एक मत बाद झाले. निवडणुकीत तीन सदस्‍य तटस्‍थ राहिले. पाच सदस्‍य गैरहजर होते. मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.

यानंतर, स्‍थापत्‍य समिती (शहर) उपाध्‍यक्ष पदासाठी पार पडलेल्‍या निवडणुकीत शिवसेनेचे श्री. सचिन पडवळ हे १७ मते मिळवून विजयी झाले. श्री. पडवळ यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार श्रीमती नेहल शाह (भाजप) यांना १० मते मिळाली.


संबंधित बातम्या

Saam TV Live