राठोडांचा राजीनामा घ्यायला शिवसेनेनं उशीर केला? आता पुढे काय?

साम टीव्ही
मंगळवार, 2 मार्च 2021
  • संजय राठोडांची मंत्रिपदावरुन उचबांगडी
  • पूजा चव्हाण प्रकरण राठोडांना भोवलं 
  • राठोडांचा राजीनामा घ्यायला शिवसेनेनं उशीर केला?

वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची, वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राजीनामा सादर केला. पण शिवसेनेनं राजीनाम्यासाठी एवढा उशीर का केला, असा सवाल विचारला जातोय.

वनमंत्री संजय राठोड यांना अखेर पूजा चव्हाण प्रकरणावरुन खूर्ची सोडावी लागलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांचा राजीनामा घेतलाय. ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाण हिचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांच्यासोबतचे तिचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर संजय राठोड गायब झाले होते. ते पोहरादेवीला आले तिथंही त्यांनी गर्दी केली. राठोड यांच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानं अखेर उद्धव ठाकरेंनी वर्षावर बोलावून राठोड यांचा राजीनामा घेतला.

राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी शिवसेनेनं एवढा उशीर का केला असा सवालही भाजपनं केलाय. राजीनामा घेतलाय आता संजय राठोडांवर एफआयआर कधी दाखल करणार असा सवालही विरोधक विचारतायत 

 उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील राजीनामा देणारे संजय राठोड हे पहिले मंत्री आहेत. पूजा प्रकरणाचा पोलिस अहवाल येण्याआधीच राजीनामा द्यावा लागला असं राठोडांच्या वक्तव्यातून जाणवत होतं. त्यामुळं यापुढं राठोडांच्या अस्वस्थतेचा स्फोट होणार का हे पाहावं लागेल.
 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live