पुण्याच्या पालकमंत्र्यांना शिवसेनेच्या माजी आमदाराचा घरचा आहेर

मंगेश गाडे
बुधवार, 21 एप्रिल 2021

पुणे Pune जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar हे जिल्ह्यातील कोरोनाची Corona परिस्थीती हाताळण्यात 'फेल "झाले आहेत असा आरोप माजी आमदार व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख शरद सोनवणे यांनी केला आहे

पुणे:  पुणे Pune जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार Ajit Pawar हे जिल्ह्यातील कोरोनाची Corona परिस्थीती हाताळण्यात 'फेल "झाले आहेत. जुन्नर Junnar तालुक्यात कोरोनाची संख्या वाढत असुन तालुक्यात ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटर बेड तिथे शिल्लक नाहीत. तसेच आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. जुन्नर तालुका पालकमंत्र्यांनी वा-यावर सोडला आहे काय? असा प्रश्न करत तसेच तालुक्याची वाट लागल्याचा आरोप शिवसेनेचे Shivsena जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनावणे Sharad Sonawane यांनी केला आहे.  Shiv Sena district chief Sharad Sonawane allegations on Guardian Minister Ajit Pawar 

जिल्हयाला रेमडेसिवरची इंजेक्शने पुरविण्याची जबाबदारी पालकमंत्र्याची आहे. केवळ राजकीय भांडवल न करता यात सुधारणा करा. जुन्नर तालुक्यात गेल्या  तीन दिवसापासून 463 रेमडेसिवर इंजेक्शनची आवश्यकता आहे. मात्र नोंदणी करून देखील ती तालुक्यातील पुरवठादार यांचेकडे उपलब्ध झालेली नाहीत. असा आरोप यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सोनावणे यांनी केला आहे.

Edited By-Sanika Gade

 

संबंधित बातम्या

Saam TV Live