शेतकरी आंदोलनावेळी शिवसेना नेते गैरहजर, डाव्यांच्या आयोजनामुळे शिवसेनेची आंदोलनाकडे पाठ?

साम टीव्ही
मंगळवार, 26 जानेवारी 2021

 

  • शेतकरी आंदोलनावेळी शिवसेना नेते गैरहजर
  • डाव्यांच्या आयोजनामुळे शिवसेनेची आंदोलनाकडे पाठ?

नाशिक ते मुंबई असा प्रवास करत शेकडो शेतकरी आपल्या हक्कासाठी मुंबईत दाखल झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. मात्र शिवसेना नेत्यांची अनुपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलीय. 

शेतकरी आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघालाय. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात राज्यातले शेकडो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वात मुंबईत एकवटले..यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही हजेरी लावत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. पण शिवसेना नेत्यांची गैरहजेरी सर्वांनाच खटकली. मुंबईत शिवसेना नेत्यांची फौज आहे मात्र तरीही एकही नेता आंदोलनावेळी उपस्थित नसल्यानं राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

हेही वाचा -

शेतकरी आंदोलनात शरद पवारांचा मोदी सरकारसह राज्यपालांवर घणाघात, म्हणे असे राज्यपाल कधी पाहिले नाहीत...

 तर शिवसेनेच्या गैरहजेरीवरून भाजपनेही तोंडसुख घेतलंय. शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं सांगतानाच मोर्चात भेंडी बाजारातील लोक घुसवल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. 

 डाव्यांना शिवसेनेचा कायमच विरोध राहिलाय. मुंबईतल्या शेतकरी आंदोलनात डाव्यांचाच वरचष्मा असल्यानं शिवसेनेनं आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातंय. असं असलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना सोबत असल्याचं शिवसेनेनं आधीच जाहीर केलं होतं. मग ऐन मोर्चावेळी शिवसेनेनं पाठ का फिरवावी? सेनेची ही भूमिका निश्चितच सर्वांना कोड्यात टाकणारी आहे. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live