खोटं बोलणाऱ्यांना घरी बसवा - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं झाले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसात सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून आमदारांच्या संपर्कासाठी गुंडागर्दी करण्यात येत आहे. माझ्याकडे यासंबंधीत अनेक पुरावे असून योग्यवेळी मी त्याचा गौप्यस्फोट करणार आहे. याआधी देखील राज्यात आधी ईडीची धमकी दिली जात होती. आता राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे.

मुंबई : पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असे ठामपणे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमच्याकडे 175 चा आमदारांचा आकडा असल्याचे सांगितले आहे. 
राज्यातील जनतेला हेच पाहिजे आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. खोटं बोलणाऱ्यांना घरी बसवा असे सांगत संजय राऊत यांनी युतीतील मित्रपक्ष भाजपला इशाराच दिला आहे. आता चर्चा मुख्यमंत्री पदावरच होईल, असे सांगत युतीतील चर्चा अद्याप पुढे झाली नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, की आमच्याकडे 170 पेक्षा जास्त 175 पर्यंत आमदारांचे समर्थन आहे. ईडी, सीबीआयसारख्या सरकारी यंत्रणांचा वापर केला जात आहे. कर्नाटकाप्रमाणे ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडं झाले आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसात सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून आमदारांच्या संपर्कासाठी गुंडागर्दी करण्यात येत आहे. माझ्याकडे यासंबंधीत अनेक पुरावे असून योग्यवेळी मी त्याचा गौप्यस्फोट करणार आहे. याआधी देखील राज्यात आधी ईडीची धमकी दिली जात होती. आता राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे.

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut says We have more than 170 MLAs supporting us


संबंधित बातम्या

Saam TV Live