Shivsena VS BJP | अमित शहांच्या टीकांवर शिवसेना नेत्यांचे पलटवार, वाचा कोण काय म्हटलं?

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021
  • शिवसेना सत्तेसाठी खोटं बोलत नाही'
  • शिवसेना नेत्यांचा शहांवर पलटवार
  • बंद दाराआड नेमकं काय बोलणं झालं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. अमित शहांच्या वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीतून शहांना प्रत्युत्तर दिलं गेलंय. त्यामुळे भाजप विरूद्ध शिवसेना असा सामना पुन्हा सुरू झालाय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय
 

संजय राऊतांचा हल्लाबोल
“1975 मध्ये रजनी पटेल आणि 90 च्या दशकात मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असं म्हटलं होतं. शिवाय 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच म्हटलं होतं, पण प्रत्येक वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. शिवसेना सत्तेसाठी कधीचं खोटं बोललेली नाही'. अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय.

दुसरीकडे तीन पायाचं हे महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल, या नारायण राणे यांच्या वक्तव्याची शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी खिल्ली उडवलीय. तर 'बेइमानी कोण करतंय हे देशातील लोकांना समजतंय,' अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केलीय.

मातोश्री या ठाकरेंच्या निवासस्थानी ज्या खोलीत शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली ती खोली दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची खोली आहे. त्यामुळे या खोलीत झालेल्या सत्तावाटपाच्या चर्चेबाबत खोटं बोलण्याचा प्रश्नच नसल्याची भूमिका यापुर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलीय. पण शहांच्या ताज्या वक्तव्याने नेमकं त्या खोलीत काय घडलं? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला


संबंधित बातम्या

Saam TV Live