शिवसेनेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांचे आभार मानत पेढे वाटले, 'हे' आहे कारण....

patil news
patil news

पंढरपूर - उजनीच्या Ujani  पाण्यावरून राष्ट्रवादीचे NCP नेते  शरद पवार  Sharad Pawar यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सांगोल्याचे शिवसेना Shiv Sena आमदार शहाजी पाटील Shahaji Patil यांनी मुख्यमंत्री CM उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांनी इंदापूरची  Indapur उपसा  सिंचन योजना रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा केला. Shiv Sena MLA thanked the Chief Minister

दोन दिवसापूर्वी आमदार शहाजी पाटील यांनी उजनीच्या पाणी वाटपा वरून थेट महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर  हल्लाबोल करत रक्तरंजित आंदोलनाचा इशारा दिला होता.  त्यांनी दिलेल्या या इशाऱ्याची  थेट मातोश्रीवरून दखल  घेतली गेली. शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने  आमदार पाटील यांच्याकडून  सविस्तर माहिती जाणून  घेतली. 

हे देखील पहा -

त्यानंतर  आमदार पाटील यांनी या  योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर  कशा पध्दतीने अन्याय  करण्यात आला यासंबंधीचे पत्रच  त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले.आमदार पाटील यांच्या पत्राची  तातडीने दखल घेवून  त्याच दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रस्तावित इंदापूर  उपसा सिंचन योजनेला स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. Shiv Sena MLA thanked the Chief Minister

त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने इंदापूरची पाणी उपसा  योजना रद्द करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार व्यक्त करत पेढे वाटले.

यावेळी आमदार  पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेला भाजपसह सर्वच पक्ष आणि संघटनांनी विरोध केला होता. यामध्ये विरोधक  मुख्यमंत्री आणि शिवसेनेला बदनाम करत होते.  ही बाब खटकल्यामुळेच मी देखील या योजनेच्या विरोधात आवाज उठवला होता.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्षात ही बाब  आल्यानंतर त्यांनाही  या योजनेला स्थगिती देण्याचे आदेश दिले.  Shiv Sena MLA thanked the Chief Minister

1995 साली  सांगोला तालुक्यातील २२ गावासाठी उपयुक्त असलेली उपसा  सिंचन योजना मंजूर करण्यात आली होती. परंतु निधी अभावी ही योजना गेल्या  २० वर्षापासून रखडली आहे. मागील  विधानसभा निवडणुकीत ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्र्यांनी  तालुक्यातील  शेतकऱ्यांना दिले आहे. या योजनेसाठी आपला पाठपुरावा  सुरू आहे. लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटून या  योजने बाबत त्यांना साकड घालणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले होते. उजनी धरणातील 117 टीएमसी पाण्याचे यापूर्वीच  वाटप झाले आहे. त्यानुसार दुष्काळी सांगोला तालुक्याच्या वाट्याचे दोन टीएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु  निधी अभावी यासह जिल्ह्यातील अशा अनेक योजना  खरडल्या आहेत .

अशा परिस्थितीत अर्थमंत्री अजित पवार आणि पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  उजनीतून सांड पाण्याच्या नावाखाली पाच टीएमसी पाणी इंदापूरला  मंजूर करून निधीची  तरतूद केली आहे. आमच्या हक्काचे पाणी अन्यत्र जात असताना  आम्ही ते  उघड्या डोळयाने  किती दिवस  बघत बसायचे असा सवाल ही आमदार पाटील यांनी  उपस्थित केला.  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कितीही चालबाजी करून पाणी नेण्याचा प्रयत्न केला तरी उजनीतून एक थेंबही पाणी इंदापूरला जावू देणार नाही. यासाठी  वाट्टेल ती किंमत मोजण्याची आपली तयारी आसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Shiv Sena MLA thanked the Chief Minister

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com