शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार म्हणतात...लसीकरण मोफतच हवे!

hemant patil
hemant patil

हिंगोली - राज्यात कोरोनानं Corona पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणसंदर्भात vaccination महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशभरात 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने central government केली आहे. Shiv Sena MPs want free vaccine

या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारने ही लस मोफत देण्याची मागणी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस Devendra Fadanvis यांनी केली, ठाकरे व फडवणीस यांच्या मागणीनंतर आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी कोरोना लसीकरण मोफत करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी या निर्णयावर होकार दिला आहे. असेही मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले होते. 

मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असे ते म्हणले होते. आमचे कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी आदित्य  ठाकेर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी या विषयवार आपले मत व्यक्त केले आहे  ते म्हणाले की, राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे.   Shiv Sena MPs want free vaccine

दरम्यान आज शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील Hemant Patil यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  कोरोना लसीकरण मोफत करण्यात यावे अशी मागणी केली, गेल्या दीड वर्षांत पेक्षा जास्त काळ कोरोनाच्या  संसर्गाने थैमान घातले आहे , त्यामुळे सर्वसामान्य माणूस आर्थिक अडचणीत आला असून संसाराचा गाडा चालवताना अनेक अडचणी येत आहेत, दैनंदिन जीवन जगताना देखील मोठी कसरत करावी लागत असल्याने, लसीकरणासाठी रक्कम मोजणे अशक्य होणार आहे, यामुळे सरकारने ही लस मोफत द्यावी तसेच ज्या नागरिकांची स्वेच्छेने  सरकार दरबारी पैसे भरून लस घेण्याची तयारी असेल अश्याना ही लस पैसे भरून द्यावी अशीही मागणी हेमंत पाटील यांनी केली.  हिंगोली जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील आज जिल्ह्यात दाखल झाले होते यावेळी  त्यांनी ही मागणी केली आहे

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com