मुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा कट शिवसेना रचतेय - आशिष शेलार

साम टीव्ही ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून कोरोनाचे कारण समोर करून निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. असा घणाघाती आरोप भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे.

नवी मुंबई :  मुंबई महापालिका निवडणूकीची चर्चा सुरू झाल्यापासून कोरोनाचे कारण समोर करून निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. असा घणाघाती आरोप भाजपा नेते आशीष शेलार यांनी केला आहे.  आगामी मुंबई महापालिकेच्या  निवडणुकीच्या मुद्द्यावरून आशीष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  मुंबईत  आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  (Shiv Sena is plotting to postpone Mumbai Municipal Corporation elections after two years - Ashish Shelar) 

"मुंबई भाजपाचे सर्व घडामोडींकडे लक्ष असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आपला पराभव पाहता शिवसेना निवडणुकीपासून पळवाट शोधत आहे. यासाठी शिवसेनेने कोरोनाचं कारण देऊन मुंबई  निवडणूक दोन वर्षांनी पुढे ढकलण्याचा  कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरलं.

'कोरोनाच्या  सर्व नियमांचे पालन करून निवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला तरी भाजपा या निवडणुकीसाठी पूर्ण तयार आहे.  तसेच, आज आम्हीही शिवसेनेला त्यांच्याच भाषेत सांगतो, बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है", अशी बॉलिवूड स्टाइल डायलॉगबाजी करत त्यांनी शिवसेनेवर पलटवार केला. 

मनसेचे सिडको व राज्य सरकारविरुद्ध 'बोंबा मारो आंदोलन'; पाहा VIDEO

धक्कादायक बाब म्हणजे शिवसनेने 30 वर्ड फोडण्याचा कट रचल्याचा आरोपही यावेळी आशीष शेलार यांनी केला. आपण कधीच जिंकू न शकणारे मुंबई महापालिकेतील 30 वॉर्डला टार्गेट करुन तिथं फोडाफोडी करण्याचा डाव शिवसेनेनं आखला आहे.  त्याचबरोबर जनगणनेनेच्या नावाखाली  मुंबईतील वॉर्ड रचना बदलण्याचं कारस्थान शिवसेना रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  

कोरोनाच्या नावाखाली 2011 च्या जनगणेनुसार 2017 ची प्रभागरचना झाली असताना त्याच जनगणनेनुसार 2022  मध्ये  जनगणना करता येणार नाही का, असा सवाल यावेळी त्यांनी विचारला  आहे. या सर्व हालचाली पाहता, निवडणुका जितक्या पुढे ढकलता येतील तितकं  पुढे ढकलण्याचा प्रयत्न  करायचा, असा शिवसेनेचा डाव आहे,  असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live