शिवसेनेची भाजपवर कुरघोडी सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

मुंबई - सत्तेच्या रेसमध्ये शिवसेनेची भाजपवर कुरघोडी सुरूच असून, नव्या सरकारमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये मुख्यमंत्रिपद आपल्याच पदरात पडावे, असा आग्रह सेना नेतृत्वाने धरल्याने भाजपची कोंडी झाली आहे. पण, ऐनवेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे येत्या 30 ऑक्‍टोबर रोजी मुंबईत येत असून, उद्धव ठाकरेंशी चर्चा करून ते यावर तोडगा काढू शकतात. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेमध्ये यंदा 50 टक्के वाटा देण्यात यावा, यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. राज्यात अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावर शिवसेना ठाम आहे. भाजपकडून मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदच मिळणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सत्तास्थापनेनंतर सुरवातीची अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, यासाठी शिवसेना नेते आग्रही आहेत; तर भाजप मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी "मातोश्री'वर बैठक पार पडली. तीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. या वेळी मुख्यमंत्रिपदासह सत्तेतील पन्नास टक्‍के वाटा मिळण्यावर शिवसेना ठाम असल्याचे चित्र आहे. 

Web Title: Shiv Sena's crush on BJP continues

संबंधित बातम्या

Saam TV Live