सोनू सूदवर शिवसेना बरसली...शिवसेनेची सोनू सूदवर जहरी टीका...

साम टीव्ही
रविवार, 7 जून 2020
  •  सोनू सूदवर शिवसेना बरसली
  • ''मजुरांना केलेल्या मदतीमागे राजकीय षडयंत्र''
  • ''सोनूचे पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक कसलेले''
  • शिवसेनेची सोनू सूदवर जहरी टीका

मजुरांसाठी मसिहा ठरलेल्या सोनू सूदवर शिवसेना बरसलीय. सोनूचा बोलवता धनी कुणीतरी वेगळाच असल्याची खरमरीत टीका करत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधलाय.

उत्तर भारतात आपल्या गावी परतणाऱ्या हजारो मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदवर शिवसेना बरसलीय. सोनू सूदचे पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक भलतेच होते आणि कसलेलेही होते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलीय. सोनू सूदचा चेहरा पुढे करुन ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.

सोनू सूदने जिवघेणा प्रवास करत उत्तर भारतात परतणाऱ्या मजुरांना मदतीचा हात दिला. कित्येक किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची सूदने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेना बरसलीय. शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपनंही सडकून टीका केलीय. 

सोनू सूदनं हजारो मजुरांना मदतीचा हात दिला. हे करत असताना त्यानं कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली येणं टाळणं. दुसरीकडे ठाकरे सरकारनंही लाखो मजुरांना उत्तर भारतात सोडल्याची आकडेवारी सादर केली. मग तरीही सोनू सूदची छोटीशी मदत शिवसेनेला का झोंबली? अशी चर्चा आता सुरु झालीय.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live