सामनातून योगी सरकारवर शिवसेनेची जहरी टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 मे 2020

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून उत्तर प्रदेशातील योगी सरकारला खडे बोल सुनावलेत.

शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून उत्तर प्रदेशातील योगी सरकारला खडे बोल सुनावलेत. 'मजुरांना स्वगृही न घेणे हे पालघरमधील साधू हत्याकांडाइतकेच निर्घृण आणि अमानुष आहे' अशा तिखट शब्दांत योगी सरकारवर शिवसेने निशाणा साधलाय. लॉकडाउनमुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांची स्वगृही परतण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे. पण, काही राज्ये आता  मजुरांना स्वगृही घ्यायला तयार नाहीत. याच मुद्दावरुन शिवसेनेने योगी सरकारवर टीका केली  आहे. 

दरम्यान नेमकं शिवसेनेच्या मुखत्रातून काय म्हटलंय, पाहा....

दरम्यान, महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांचा आकडा 15 हजाराच्या वर गेला आहे. एकट्या मुंबईत 9 हजार 945 रुग्ण आहेत. तर मुंबईत मरण पावलेल्यांची संख्या 387 वर गेलीय. पुणे शहर-जिल्ह्यात 2 हजार 962 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू झालाय. नवी मुंबई महापालिका हद्दीत 415 तर नाशिक शहर-जिल्ह्यात 401 रुग्ण आढळलेत. यातही एकट्या मालेगावात 361 रुग्ण असून तिथंच 12 जणांचा मृत्यू झालाय. नागपुरात 181 रुग्ण आढळले आहेत. राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्याही 2 हजार 819 वर पोहोचलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live