शिवसंग्राम महायुतीसोबतच; विनायक मेटेंचा जयदत्त क्षीरसागरांना पाठींबा

शिवसंग्राम महायुतीसोबतच; विनायक मेटेंचा जयदत्त क्षीरसागरांना  पाठींबा

बीड : मागच्या पाच वर्षांपासून बीडमधून लढण्याची तयारी करणाऱ्या शिवसंग्राम व शिवस्मारक समिती अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, जिल्ह्याबाबत शिवसंग्रामने भूमिका स्पष्ट करत 'महायुतीसोबतच' असा नारा दिल्याने शिवसेनेच्या गोटात चांगलाच उत्साह संचारला आहे. मेटेंच्या भूमिकेचा सर्वाधिक फायदा बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना आणि केजमधील नमिता मुंदडा यांना अधिक होणार आहे.

शिवसंग्राम आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे मागच्या पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासून ही निवडणुक लढविण्यासाठी तयारी करत होते. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामे करण्याबरोबरच त्यांनी तगड्या कार्यकर्त्यांची फळीही उभारली. निवडणुक लढविण्यासाठीची बुथ यंत्रणाही उभारली होती. परंतु, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली. दरम्यान, राज्यात महायुतीसोबत असणारी त्यांची शिवसंग्राम जिल्ह्यात काय करणार, असा प्रश्न होता. त्यांचे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या प्रचारापासून दूर होते.

 मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. शिवसंग्राम महायुतीसोबतच असून कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असे आवाहन शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंडगे यांनी केले आहे. त्यामुळे बीडच्या शिवसेनेत आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. आता बीडमध्ये शिवसंग्रामची साथ भेटल्याने क्षीरसागरांचे बळ वाढणार वाढेल असा अंदाज आहे. बीडबरोबरच केजमध्येही शिवसंग्रामची ताकद आहे.


 त्यामुळे नमिता मुंदडांनाही या भूमिकेचा फायदा होईल. कोलंगडे यांनी निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. महायुतीत शिवसंग्रामला भाजपने तीन जागा दिल्या आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्राम महायुतीत असून बीड जिल्ह्यातही शिवसंग्राम महायुतीच्या सोबतच असल्याचे कोलंगडे यांनी सांगीतले. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कुठलाही संकोच न बाळगता महायुतीच्याच अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

या वेळी जेष्ठ नेते लक्ष्मण ढवळे, सुहास पाटील, अनिल घुमरे, अ‍ॅड. राहुल मस्के, नारायण काशिद, सुभाष सपकाळ, बाळासाहेब जटाळ, बबन माने, मिरा डावकर, शितल पिंगळे, राहुल बनगर, नवनाथ प्रभाळे, सुधिर काकडे, अजय सुरवसे, मनोज जाधव उपस्थित होते. यारी करणाऱ्या शिवसंग्राम व शिवस्मारक समिती अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, जिल्ह्याबाबत शिवसंग्रामने भूमिका स्पष्ट करत 'महायुतीसोबतच' असा नारा दिल्याने शिवसेनेच्या गोटात चांगलाच उत्साह संचारला आहे. मेटेंच्या भूमिकेचा सर्वाधिक फायदा बीडचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांना आणि केजमधील नमिता मुंदडा यांना अधिक होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com