शिवसेना भरलेली थाळी देते, रिकाम्या थाळ्या वाजवायला सांगत नाही ...

प्रदीप भणगे
शनिवार, 1 मे 2021

महाराष्ट्रात सर्वत्र लॉकडाउन सदृश परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री यांनी गरिब व गरजवंतांनासाठी मोफत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखा व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने गरजवंतांसाठी विनाअनुदानित मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.

डोंबिवली : महाराष्ट्रात Maharshtra सर्वत्र लॉकडाउन Lock Down सदृश परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी गरीब व गरजवंतांनासाठी मोफत शिवभोजन Shivbhojan Thali थाळी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखा व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या वतीने गरजवंतांसाठी विनाअनुदानित मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. Shivbhojan Thali Started by Shivsena in Dombivali

कल्याण-डोंबिवलीत Kalyan Dombivali शिवभोजन थाळी कुठे दिसत नाही अशी सडकून टीका भाजपच्या BJP कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर करण्यात आली होती.त्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखा व शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यावतीने गरजवंतांसाठी विनाअनुदानित मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे.

सुमारे 500 लोक या थाळीचा लाभ घेतील असे शिवसेनेकडून Shivsena सांगण्यात आले.या थाळीचे उद्घाटन जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले.यावेळी त्यानी भाजपला टोला लगावला. आम्ही अन्नाने भरलेली थाळी देतो रिकामी थाळी वाजवायला सांगत नाही असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी लगावला.यावेळी गोपाळ लांडगे,राजेश मोरे,भय्या पाटील,सतीश मोडक, कविता गावंड, राजेश कदम उपस्थित होते..

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live