'त्या' फाईलवर राज्यपालांची सही झाली की राजभवनला पेढे वाटू - संजय राऊत 

सुमित सावंत
मंगळवार, 25 मे 2021

राज्यपाल नियुक्त आमदारांची फाईल राजभवनात सापडली ही आनंदाची गोष्ट आहे. आता या फाईलवर राज्यपाल ज्या वेळी सही करतीत त्यावेळी आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू, असा टोमणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी मारला आहे

मुंबई : राज्यपाल Governor नियुक्त आमदारांची फाईल File राजभवनात सापडली ही आनंदाची गोष्ट आहे. आता या फाईलवर राज्यपाल ज्या वेळी सही करतीत त्यावेळी आम्ही संपूर्ण राजभवनला Rajbhavan पेढे वाटू, असा टोमणा शिवसेना Shivsena नेते संजय राऊत Sanjay  Raut यांनी मारला आहे. ही फाईल गायब झाली की भुतानं पळवली असा खोचक प्रश्न काल राऊत यांनी विचारला होता. Sanjay Raut Criticism on Maharashtra Governor over Missing File

महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यपाल नियुक्त विधानपरिषद जागांसाठीची फाईल राज्यपालांकडं पाठविण्यात आली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून हा विषय प्रलंबित आहे. त्यावरुन महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना लक्ष्य बनवित आहेत. याबाबत निर्णय का होत नाही, अशी विचारणा काही काळापूर्वी उच्च न्यायालयानंही केली होती. त्यातच माहिती अधिकार कायद्याखाली विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही फाईल गहाळ झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे अधिकच गदारोळ उडाला होता. 

बुलडाणा जिल्ह्यातील १३८ गावांमध्ये कोरोनाला नो एंट्री

आज सकाळी ही फाईल सापडल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर राऊत यांनी त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही, आणि भूतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. याबाबत उच्च न्यायालयानेही प्रश्न विचारलाय की फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही? ती बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का? महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाने १२ सदस्यांची नावं दिलेली आहेत, त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेल ते न शोभणार आहे, 

''राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतीमानता वाढवावी. तर महाराष्ट्र परंपरा गतिमान राहील, असेही राऊत म्हणाले. टुलकीट  प्रकरणात देशात चर्चा सुरू आहे, याबाबत राऊत म्हणाले, "सगळ्या समाज माध्यमांचा वापर भाजपने विरोधकांविरोधात केलाय. प्रकरण त्यांच्यावर उलटल्यावर छापे टाक, याला पकडा त्याला पकडा असं सगळं सुरू आहे,'' Sanjay Raut Criticism on Maharashtra Governor over Missing File

दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप नेत्यांची बैठक झाली. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "सरसंघचालक मोहनराव भागवत आदरणीय आहेत. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावीत, अशी आमची अपेक्षा असते.  त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो मृतदेह वाहून आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता. राममंदिरा इतकाच महत्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अशी अपेक्ष जनतेला होती. आजही आम्ही सरसंघचालकाना आवाहन करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं,''

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live