शिवसेना व युवासेनेच्या वतीने मेहेकरमध्ये कोविड सेंटर सुरु

संजय जाधव
सोमवार, 3 मे 2021

शिवसेना व युवासेनेच्या वतीने मेहेकर शहरात श्रीमती सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे

मेहकर : शिवसेना Shivsena व युवासेनेच्या वतीने मेहेकर Mehekar शहरात श्रीमती सिंधुताई जाधव Sindhutai Jadhav कोविड Covid केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आप आपल्या विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रूग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव Prataprao Jadhav यांनी केले आहे. Shivsena and Yuva Sena Started Covid Center in Memekar

१०० बेडच्या Bed सर्व सुविधायुक्त या कोविड सेंटरचे, खासदार प्रतापराव जाधव यांनी उदघाटन केले आहे. यावेळी बोलताना खासदार जाधव म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्येक विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रूग्णांना सेवा व हिंमत द्यावी. मेहकर मधील या कोविड केअर सेंटर मध्ये रूग्णांना सर्व सुविधा, वायफाय WiFi, योगा शिकवला जाणार आहे. तसेच स्वादिष्ट जेवणाची व काढ्याची सोय केली जाणार आहे.

सर्व सुविधा सह मोफत कोविड सेंटर सुरु केल्याने मेहेकर लोणार Lonar तालुक्यातील हजारो नागरिकांना लाभ मिळणार आहे. ऑक्सीजनचे २० बेड राहणार असून लवकरच वेंटिलेटरची Ventilator सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे. Shivsena and Yuva Sena Started Covid Center in Memekar

तसेच दीड कोटी रूपयाचे रेमडीसीवीर Remedesivir इंजेक्शन सुद्धा मागवली आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्व सुविधा मिळणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर Sanjay Raimulkar यांनी माहिती दिली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live