कल्याण मध्ये चक्क शिवसेना-भाजपाची युती....

Kalyan Panchayat Committee Election
Kalyan Panchayat Committee Election

कल्याण : राज्य Maharashtra  आणि देशपातळीवर एकीकडे सेना Shivsena आणि भाजपामध्ये BJP एकमेकांविरोधात कडक भूमिका घेत आहेत.मात्र कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत सेना-भाजप एकत्र आल्याचे दिसून आले आहे.भाजपच्या पाच सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मत देत चक्क सेनेच्याच अधिकृत उमेदवाराला पराभूत केले आहे. Shivsena BJP Came Together in Kalyan 

पंचायत समिती कल्याणच्या Kalyan उपसभापती पदाची निवडणुक आज पार पडली. यामध्ये शिवसेनेने व्हिप (पक्षादेश) काढत भरत काळू भोईर यांचे नाव निश्चित केले. मात्र हा व्हिप मोडत शिवसेनेचे दुसरे सदस्य किरण ठोंबरे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत ही निवडणूक जिंकली. शिवसेनेच्याच सदस्याने शिवसेनेच्याच सदस्याचा पराभव केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे देखिल पहा - 

विशेष म्हणजे किरण ठोंबरे यांना भाजपच्या पाच सदस्यांनी मतदान केल्याने सेना भाजपच्या युतीचे वारे पुन्हा एकदा वाहू लागले की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.भरत काळू भोईर यांना शिवसेनेच्या दोन सदस्यांनी आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी मतदान केले, तर राष्ट्रवादीच्या एक सदस्या तटस्थ राहील्या.Shivsena BJP Came Together in Kalyan

त्यामुळे किरण ठोंबरे यांना सहा मते तर भरत भोईर यांना पाच मते पडली. पक्षाचा व्हिप तोडल्याने भरत भोईर यांनी नाराजी व्यक्त करीत शिवसेना पक्षा बरोबर एक प्रकारे गद्दारी केली असे संदेश समाज माध्यमावर फिरविले.किरण ठोंबरे विजयी झाल्यानंतर गावात फटाके वाजवून त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत कमी नागरिकांच्या उपस्थितीत गावात विजयी मिरवणूकही काढण्यात आली. 

पंचायत समितीचे पक्षीय बलाबल

भाजप - ५

शिवसेना - ४

राष्ट्रवादी - ३

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com