मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलोय: उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : परतीच्या पावसाने शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट झाली असून, मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांधावर आलो आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, की सरकारकडून देण्यात येणारे 10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत. केंद्राकडून राज्यासाठी भरघोस मदत घेण्यात येईल. तुम्ही खचून जाऊ नका. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलो आहे. तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहेत. तुम्हा सर्वांचे चांगले केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कोणीच आत्महत्येचे पाऊल उचलू नका. आमचे सरकार आले तर सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.

Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray meet rain affected farmers in Aurangabad

संबंधित बातम्या

Saam TV Live