आदित्य माझ्यापेक्षा जास्त मेहनती : उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

मुंबई : शिवसेनाप्रमुखांनी मला सांगितलेलं. उद्धव, एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही आणि तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारसुद्धा नाही. तू तुझं काम कर. शिवसैनिकांनी जर तुला स्वीकारलं तर मी कुठे आड येणार नाही; पण त्यांच्या मनात नसेल तर मी तुला लादणार नाही. तसंच धोरण मी आदित्यच्या बाबतीतही ठेवलंय. प्रामाणिकपणे बोलायचं तर, आदित्य माझ्याही पेक्षा कित्येक पटीने मेहनत करतोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’साठी संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. उद्धव ठाकरे युतीवर आणि शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीवर परखडपणे बोलले. ‘24 तारखेनंतर पुन्हा बोलू. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवून दाखवतो हे माझे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे!’ असे उद्धव यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, की आदित्य राजकारणात आल्याने माझा खूपसा भार त्याने हलका केला आहे. आदित्य आला म्हणजे तो मुख्यमंत्री होणार, उपमुख्यमंत्री होणार असे नाही. थांबा ना जरा. ही त्याची पहिली निवडणूक आहे. त्याला संसदीय कामकाजात रस आहे. मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल. तुम्ही पण पाहिलंय, लोकसभेत जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो, एखादं वेगळं बिल येतं तेव्हा तो आवर्जून तिकडे येतो. विधिमंडळातसुद्धा तो आवर्जून तिकडे गॅलरीत बसतो. त्याला इंटरेस्ट आहे. हे क्षेत्र वाईट नाही. उलट चांगली मुलं, तरुण मुलीसुद्धा या क्षेत्रात याव्यात. त्यांनीही राज्याचा आणि देशाचा कारभार हाती घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे.

Web Title: Shivsena chief Uddhav Thackeray talked about Aditya Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live