सेनेसाठी खोदलेल्या खड्डात तुम्ही पडलात - दादा भुसेंनी भाजपला सुनावलं

सरकारनामा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020


तुम्ही शिवसेनेसाठी खड्डा खोदलात, नियतीने तुम्हाला त्या टाकण्याचे काम केले, अशा शब्दात शिवसेना नेते व कृषीमंत्री दादा भुसे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टिका करण्यात आली त्यावर भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबई : तुम्ही शिवसेनेसाठी खड्डा खोदलात, नियतीने तुम्हाला त्या टाकण्याचे काम केले, अशा शब्दात शिवसेना नेते व कृषीमंत्री दादा भुसे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टिका करण्यात आली त्यावर भुसे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?, अशी भाषा शेलार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वापरली. त्याचा भुसे यांनी समाचार घेतला आहे.

याबाबत साम टिव्हीशी बोलताना दादा भुसे म्हणाले, "राजकारणाचा दर्जा घसरतो आहे. अशिष शेलार साहेबांनी संयम ठेवायला पाहिजे. ग्रामीण भागात याला जर जसं उत्तर द्यायची वेळ आली तर आधीचं राज्य तुमच्या बापाचं होतं का?  असं विचारावं लागेल. कुणाचा बाप काढण्याची आवश्यकता नाही. आपल्या मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.''

भुसे पुढे म्हणाले, "आपल्या मित्रपक्षाच्या जागा पाडण्याचे पाप तुम्ही केले याचे उत्तर जनतेला द्या. शिवसेनेसाठी खड्डा खोदला होता नियतीने त्यात तुम्हाला टाकण्याचा काम झाले आहे. भाजपच्या नेत्यांचr तडफड पाहायला मिळते आहे. जसं पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तडफडतो तशी अवस्था भाजपच्या नेत्यांची झाली आहे,''

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live