आमदारांमधील वादामुळे बुलढाण्यात होती युद्धजन्य स्थिती

संजय जाधव
मंगळवार, 20 एप्रिल 2021

माझ्या गाडीवर बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आता मी गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिम्मत असेल मला अडवून दाखवा, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला.

 

बुलढाणा - शिवसेना आमदार संजय गायकवाड shivsena mla sanjay gaikwad यांनी जर मला कोरोनाचा corona जंतू सापडला असता तर देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांच्या तोंडात कोंबला असता असे  खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप bjp आमदार व कार्यकर्त्याकडून गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे vijayraj shinde यांनाच मारहाण करण्याचा केला. shivsena mla sanjay gaikwad against bjp mla sanjay kute 

या संपूर्ण वादानंतर आमदार संजय कुटे sanjay kute यांच्या गाडीवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रित येत त्याचा निषेध केला. जिल्ह्याधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यलयसमोर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार  घोषणाबाजी केली.

माझ्या गाडीवर बुलडाणा buldhana येथे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आता मी गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिम्मत असेल मला अडवून दाखवा, असा इशारा आमदार संजय कुटे यांनी दिला.  shivsena mla sanjay gaikwad against bjp mla sanjay kute 

सध्या जिल्ह्यात व संपूर्ण राज्यात नागरिक कोरोना मुळे हैराण आहे. त्यात आता शिवसेनेच्या एका आमदारा विरुद्ध भाजपचे दोन आमदार आणि दोन माजी आमदार असे हजारो कार्यकर्त्यांसह आमने सामने आल्याने बुलढाण्यात काल अक्षरशः युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळत आमदार कुटे यांना परत आपल्या गावी पाठविले. त्यांच्यावर व त्यांच्या ताफयावर तथाकथित हल्ला होण्याच्या घटनेने बुलढाण्यात अजुन तणाव वाढला होता. पोलिसांचा मोठा ताफा आल्यामुळे पुढील संघर्ष टळला. मात्र हे नक्की की लोकप्रतिनिधिना कोरोनाग्रस्त जनतेच्या आरोग्याशी काही देने नसल्याच  बुलढाण्यातील या हाय होल्टेज ड्रामा मुळे स्पष्ट होते.

Edited by - Shivani Tichkule

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live