वारकऱ्यांच्या माफीनंतर लगेचच संजय गायकवाडांचे बिर्याणी वाटप

Chicken Biryani Distribution by Sena MLA Sanjay Jadhav in Buldana
Chicken Biryani Distribution by Sena MLA Sanjay Jadhav in Buldana

बुलडाणा :  रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मांसाहार करा असे सांगून वारकऱ्यांचा रोष ओढवून घेणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांची माफी मागितल्याच्या दुसऱ्याच दिवशी  येथील कोविड सेंटरमध्ये 
चिकन बिर्याणी वर उकडलेल्या अंड्यांच्या आहाराचे वाटप केले. Shivsena MLA Sanjay Jadhav Distributed Biryani at Covid Centre in Buldana

बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सर्व सरकारी कोविड रुग्णालय त्याचबरोबर खाजगी कोविड रुग्णालय फुल झाले आहेत त्यामुळे कोरोणाच्या महामारीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी किमान एक दिवस आड अंडे, मटण , चिकन हे आपल्या आहारात घ्यावे आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवावी, असे आवाहन शासन व डॉक्टर यासोबत आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

हे देखिल पहा

शासनाच्या गाईडलाईन नुसार आज कोरोणा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना चिकन बिर्याणी व बॉईल अंड्यांचे वाटप करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले आहे. Shivsena MLA Sanjay Jadhav Distributed Biryani at Covid Centre in Buldana

चार दिवसांपूर्वी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका सांज दैनिकाला दिलेल्या माहितीत केलेल्या व्यक्तव्यामुळे उदभवलेला वाद त्यानंतर वारकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी संजय गायकवाड यांना फोनवरून केलेली विचारणा  संजय गायकवाड यांनी वारकरी प्रतिनिधींना फोनवरून केलेली शिवीगाळीचे वायरल झालेले ऑडिओ क्लिप यामुळे मोठं वादंग झालं होतं. मात्र, आता आमदार गायकवाड यांनी वारकऱ्यांप्रती दिलगीरी व्यक्त केली. 

आमदार गायकवाड यांनी उपवास-तपास करू नका मांसाहार करा आणि कोरोना काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही, असे वक्तव्य केल्याची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रात वारकरी मंडळी संतापली होती. Shivsena MLA Sanjay Jadhav Distributed Biryani at Covid Centre in Buldana

अनेक वारकऱ्यांनी गायकवाड यांना फोन करुन याबाबत जाब विचारला होता. हे प्रकरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यन्त पोहचविण्यात वारकरी संघटनांना यश आल्यावर मुख्यमंत्र्यानी संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करायला सांगितल्यावर गायकवाड यांनी एका व्हिडीओ द्वारे राज्यातील वारकऱ्यांप्रती दिलगिरी व्यक्त केली होती.
Edited By - Amit Golwalkar
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com