आमदार संजय गायकवाड यांनी अखेर केली दिलगीरी व्यक्त

Sanjay Gaikwad
Sanjay Gaikwad

बुलडाणा : गेल्या चार दिवसांपूर्वी बुलडाण्याचे Buldana आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी एका सांज दैनिकाला दिलेल्या माहितीत केलेल्या व्यक्तव्यामुळे उदभवलेला वाद त्यानंतर वारकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी संजय गायकवाड यांना फोनवरून केलेली विचारणा  संजय गायकवाड यांनी वारकरी प्रतिनिधींना फोनवरून केलेली शिवीगाळीचे वायरल झालेले ऑडिओ क्लिप यामुळे मोठं वादंग झालं होतं. मात्र, आता आमदार गायकवाड यांनी वारकऱ्यांप्रती दिलगीरी व्यक्त केली आहे. Shivsena MLA Sanjay Gaikwad expressed Apology through video

आमदार गायकवाड यांनी उपवास-तपास करू नका मांसाहार करा आणि कोरोना काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही, असे वक्तव्य केल्याची बातमी एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रात वारकरी मंडळी संतापली होती. अनेक वारकऱ्यांनी गायकवाड यांना फोन करुन याबाबत जाब विचारला होता.

हे देखिल पहा

राज्यात अनेक ठिकाणी संजय गायकवाड यांच्या बद्दल वारमध्ये नाराजी दिसत होती. हे प्रकरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यन्त पोहचविण्यात वारकरी संघटनांना यश आल्यावर मुख्यमंत्र्यानी संजय गायकवाड यांना समज देऊन वारकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करायला सांगितल्यावर गायकवाड यांनी एका व्हिडीओ द्वारे राज्यातील वारकऱ्यांप्रति दिलगिरी व्यक्त केली आहे. Shivsena MLA Sanjay Gaikwad expressed Apology through video

मात्र दिलगिरी व्यक्त करतानाही संजय गायकवाड आपल्या भाषेवर व आवेशावर संयम ठेऊ शकले नाहीत त्यांनी आपल्या विरुद्ध जर कुण्या पोलीस अधिकाऱ्याने खोटी केस दाखल केली तर त्याविरुद्ध हक्कभंग आणू अशी जणू धमकी दिलीये.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com