बाळासाहेबांनी आम्हाला शब्द पाळायला शिकवलं, पण... : संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

मुंबई : भाजपने दिलेला शब्द पाळायला हवा, फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्यूलानुसारच मुख्यमंत्री पदाचंही समसमान वाटप व्हावं, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केली आहे. भाजपने युतीधर्माचे पालन करायला हवे. तसेच विनाशकाले विपरित बुद्धी ही आमची नाही, तर भाजपची अवस्था आहे, असेही राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

दिलेला शब्द पाळायचा ही बाळासाहेबांची शिकवण आहे. शिवसेनेने कोणतीही नरमाईची भूमिका घेतलेली नाही. जागावाटपाबाबत युतीत चर्चा होऊ शकते. अमित शहांच्या उपस्थितीत जी पत्रकार परिषद झाली होती, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समसमान फॉर्म्यूला असेल असे म्हटले होते, आमचीही तीच मागणी आहे, मात्र आता ते त्यांचा शब्द पाळताना दिसत नाहीत. शिवसेना आमच्यासोबत येणार नसेल, तर आम्हाला इतर पर्याय खुले आहेत, असे भाजप म्हणू शकते, तर शिवसेनेकडेही इतर बरेच पर्याय आहेत, मात्र उद्धध ठाकरे असे कधीच करणार नाहीत. आम्ही नेहमीच शब्द पाळतो. असे राऊत यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्रिपदावरून एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपने अपक्षांना आपल्याकडे ओढण्यास सुरवात केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी "मातोश्री' येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढून 62 वर गेले असून, भाजपकडे 112 आमदार आहेत. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली असताना मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी, या दोन्ही पक्षांची एकही संयुक्त बैठक झालेली नाही. दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

Web Title: Shivsena MP Sanjay Raut Speaks at Press conference on Shivsena BJP
 
संबंधित बातम्या

Saam TV Live