शिवसेना पदाधिकाऱ्याचा पंचायत समिती महिला सदस्यावर खुनी हल्ला

गोपाळ मोटघरे
गुरुवार, 27 मे 2021

पुणे जिल्ह्यातील खेड  तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

पिंपरी : पुणे Pune जिल्ह्यातील खेड Khed तालुका पंचायत समितीचे शिवसेनेचे Shivsena विद्यमान सभापती भगवान पोखरकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला Attack केल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. Shivsena Office Bearer in Pund District Attacks Women Member

पुण्यातील डोणजे गाव परिसरातील डोंगरावरील एका खासगी रेसॉर्ट हा जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. भगवान पोखरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. या हल्ल्यात दोनजन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे देखिल पहा

पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणूकिवरून हा वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. भगवान पोखरकर यांचा अध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्या नंतरही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते. म्हणून  समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसोबत मिळून पोखरकर विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला, Shivsena Office Bearer in Pund District Attacks Women Member

हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा अनोखा प्रकार

त्या ठरावाच्या बाजूने येत्या 31 तारखेला मतदान होणार होतं त्यामुळे ठराव मांडणारे सर्व सदस्य एका खासगी रिसॉर्ट मध्ये थांबले होते. मात्र ही माहिती पोखरकर यांना मिळाली आणि त्यांनी रात्री आपला भाऊ आणि कार्यकर्त्यां सोबत येऊन आमच्यावर बंदूक, कोयता आणि लोखंडी गजानी जीवघेणा हल्ला केला, अशी तक्रार सांडभोर यांनी दिली या घटनेमुळे खेडचं राजकीय वातावरण तापलं असून पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live