आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पहिल्या ठाकरेंना आदित्यला बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सेनेने सुरू केले  आहेत. खासदार संजय राउत यांना ही कल्पना सुचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे त्यांनी तशी चाचपणी केली पण असे घडणे शक्य नसल्याचे उत्तर त्यांना मिळाल्याचेही सांगण्यात येते आहे.

मला शिवसेनेच्या 'स्टाईल'ने काम करायचे आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,' असे सांगत आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी केली. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या 66 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 'मी निवडणूक लढवणार', असे थेट सांगत स्वतः आदित्य ठाकरे यांनीच वरळीतील "विजय संकल्प' मेळाव्यात आपल्या नावाची घोषणा केली. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्‍मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे आवर्जून उपस्थित होते. उद्धव ठाकरे मात्र या वेळी उपस्थित नव्हते.  

"आपले मंगळयान जरी मंगळावर उतरले नसले तरी हे सूर्ययान 21 तारखेनंतर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही,'' अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा छावा आता राजकारणात उतरला आहे. आजपर्यंत ठाकरे कुटुंबीय निवडणूक लढले नव्हते. मात्र, इतिहास घडवताना नियम बाजूला ठेवायचे असतात असेही राऊत म्हणाले. "आजचा हा माहौल बघून ट्रम्पदेखील आदित्य यांच्या प्रचाराला येतील. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर आदित्य यांच्याशिवाय पर्याय नाही. आजचा प्रवेश हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,'' असे राऊत यांनी सांगितले. 
 
Web Title: Shivsena tries Aditya Thackeray elect unoppose in Worli constituency
 
संबंधित बातम्या

Saam TV Live