सावरकरांवरुन सेना -भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं

साम टीव्ही
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र काँग्रेसद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या 'शिदोरी' या मासिकात सावरकरांचा 'माफीवीर' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी आणि काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल केलाय. त्यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे सेना -भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची चिन्हं आहेत.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पेटलेली ठिणगी इतक्यात विझण्याची शक्यता नाही. शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी असल्याचं सांगत भाजपने ठाकरेंवर प्रतिहल्ला केलाय. सावरकरांवर काँग्रेसने केलेल्या टिकेचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
 
महाराष्ट्र काँग्रेसद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या 'शिदोरी' या मासिकात सावरकरांचा 'माफीवीर' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे या पुस्तकावर तातडीने बंदी घालावी आणि काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली होती. एवढंच नाही तर या प्रकरणी शिवसेना गप्प का असा सवालही भाजपने केला होता. भाजपच्या या डावावर शिवसेना नेते संजय राऊतांनीही प्रतिडाव टाकलाय.

पाहा संजय राऊत आणि राम कदमांनी सावरकरांवर काय मत व्यक्त केलंय?