#Ayodhya | राम मंदिरासाठी शिवसेना फाडणार 1 कोटींची पावती

वैदेही काणेकर
शनिवार, 7 मार्च 2020
  • अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
  • योगी सरकारनं जागा दिल्यास रामभक्तांसाठी अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधणार

उत्तर प्रदेश - अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपयांची निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्यत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या वेळी ते पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की शिवसेनेतर्फे राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. राम मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रामभक्त येणार आहेत.  त्यांना राहण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागा द्यावी. या जागेवर महाराष्ट्र भवन उभारू. राम मंदिर सर्वांसाठी आहे. हे मंदिर पाहण्यासाठी जगभरातून रामभक्त येतील, असेही त्यांनी नमूद केले. 

 

हेही वाचा - अरे देवा! ऐन लग्नसराईत सोनं प्रतितोळा 50 हजार होणार?

हेही वाचा - वसिम जाफरची सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या. अयोध्येत दाखल होताच उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. शिवसेनेचे अनेक नेतेही अयोध्येत दाखल झाले. शिवसेनेच्या नेत्यांसोबत काँग्रेस नेते सुनील केदारही अयोध्येत आल्याचं पाहायला मिळालं. 

हेही पाहा - मी 10वीत 37 टक्यानं पास झालो- राज ठाकरेंची दिलखुलास मुलाखत

हेही वाचा - आता गणेश नाईकांची बारी; नवी मुंबईतील 'या' शिवसेना नगरसेवकाचा राजीनामा

 

ज्या शिवसैनिकांनी 1993 मध्ये कारसेवा करत वादग्रस्त बाबरी मशिदी तोडली होती, त्यातील काही शिवसैनिकही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत दाखल झाले होते. यावेळी दाखल झालेल्या शिवसैनिकांनी जय श्री रामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

 

पाहा व्हिडीओ - 

 

 

shivsena will give 1 cr to ram mandir temple uddhav bjp up

yogi ayodhya india politics 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live