नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही पेटली

साम टीव्ही
गुरुवार, 12 मार्च 2020
  • शिवशाही बस अपघातांची मालिका सुरूच
  • नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही पेटली
  • अलर्ट ड्रायव्हरमुळे बचावले प्रवासी
  • चंदनापुरी शिवारातील आनंदवाडी येथे आगडोंब

संगमनेर: एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका कायम आहे. नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. सकाळी आठच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने बसमधील बिघाडाबाबत ड्रायव्हरला आधीच कल्पना आली. त्याने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. 22 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यानंतर क्षणार्धात शिवशाही बस आगीच्या लोळात सापडली. ड्रायव्हरच्या या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे जीव बचावला आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील आनंदवाडीच्या महामार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

हे ही वाचा - प्रवासात गाडी लागते आणि उलटी होते? काय आहे कारणं आणि उपाय वाचा...

हे ही वाचा - 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले

हे ही वाचा - कोरोनासाठी मोदी सरकार महत्वाचा निर्णय घेणार 

 

Webtitle: Shivshahi Bus on Fire on Nashik Pune Highway


संबंधित बातम्या

Saam TV Live