धक्कादायक ! पुणे मनपा शाळेतील मुलांना पोषण आहारात पशू आहार

साम टीव्ही
शनिवार, 20 मार्च 2021

शालेय पोषण आहार की पशू आहार?
जनावराचा खुराक शाळकरी मुलांना
सडक्या कडधान्याच्या मापातही पाप

 

 

 

पुणे महापालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली चक्क पशुआहार दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नगरसेविका आणि जागरुक पुणेकरांनी हा प्रकार उघडकीस आणलाय.

पुण्याच्या हडपसर उतरवण्यात येणाऱ्या या कडधान्याच्या गोणी पाहा.... कडधान्यावर स्पष्टपणं पशुआहार असं लिहलंय. पण या गोणी उतरवण्यात येतायत शाळेत... शाळेतल्या मुलांना पोषण आहाराच्या नावाखाली जनावरांचा खुराक खायला दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्थानिक नगरसेविकेनं जेव्हा या पोषण आहाराची तपासणी केली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

 गुरांचा जो पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जातो त्याच्या मापातही पाप केलं जातंय. ५० किलोची गोणी असं लिहलं असताना वजनात मात्र ती 45 किलोच भरतेय.

 शाळकरी मुलांना गुरांचा आहार खाऊ घालणाऱ्या ठेकेदारांवर आणि त्याला अभय देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होतेय.
सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live