धक्कादायक : कोरोनामुळे चार पोलिसांचा मृत्यू

साम टीव्ही न्यूज
रविवार, 14 जून 2020

 कोळे-कल्याण येथील पोलीस वसाहतीत राहणारे कांबळे महिन्याभरात निवृत्त होणार होते. चाचणी अहवालात ते बाधित असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कै लास आव्हाड यांनी दिली. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेणारे दिंडोशी पोलीस ठाण्याचे हवालदार हेमंत कुंभार यांचा शुक्र वारी रात्री मृत्यू झाला. कुंभार ४ जूनपासून उपचार घेत होते.

मुंबई : करोना संसर्गाची बाधा झाल्यानंतर अग्निशमन दलातील अग्निशामक प्रकाश पाटील यांची मृत्यूसोबतची झुंज अखेर अपयशी ठरली. सेव्हन हिल्स रुग्णालयात शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत अग्निशमन दलातील आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

 कोळे-कल्याण येथील पोलीस वसाहतीत राहणारे कांबळे महिन्याभरात निवृत्त होणार होते. चाचणी अहवालात ते बाधित असल्याचे लक्षात येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कै लास आव्हाड यांनी दिली. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेणारे दिंडोशी पोलीस ठाण्याचे हवालदार हेमंत कुंभार यांचा शुक्र वारी रात्री मृत्यू झाला. कुंभार ४ जूनपासून उपचार घेत होते. बोरिवली पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले संदेशी किणी (४७) यांचा शनिवारी नालासोपारा येथील स्टार रुग्णालयात मृत्यू झाला, तर सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्या ताफ्यातील दीपक लोळे यांचा  नवी मुंबईतल्या डी. वाय. पाटील रुग्णालयात मृत्यू झाला. ते सुरक्षा व संरक्षण विभागात नेमणुकीस होते.मुंबई पोलीस दलातील करोनाबाधित अधिकारी, अंमलदारांच्या मृत्यूचा आकडा २६ वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत चार सहकाऱ्यांचे मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दलात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.  वाकोला पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल कांबळे (५८) यांचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

WebTittle :: Shocking: Four policemen killed by Corona


संबंधित बातम्या

Saam TV Live