धक्कादायक ! सशस्त्र दलातील 800 जवानांची आत्महत्या पाहा कशामुळे आत्महत्याचा मार्ग निवडतात..

सिध्दी चासकर.
मंगळवार, 23 मार्च 2021

अत्यंत धक्कादायक बातमी, गेल्या सात ते आठ वर्षात लष्कर, नौदल आणि वायूदलातील 800 जवानांनी आत्महत्या केली आहे, ही माहिती केंद्र सकारने राज्यसभेत दिली आहे, लष्करात 14 लाख जवान आणि कर्मचारी सशस्त्र दलात काम करत आहेत, मात्र आत्महत्येची आकडेवारी पाहता चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे,

अत्यंत धक्कादायक बातमी, गेल्या सात ते आठ वर्षात लष्कर, नौदल आणि वायूदलातील 800 जवानांनी आत्महत्या केली आहे, ही माहिती केंद्र सकारने राज्यसभेत दिली आहे, लष्करात 14 लाख जवान आणि कर्मचारी सशस्त्र दलात काम करत आहेत, मात्र आत्महत्येची आकडेवारी पाहता चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे, वायूदलातील 160 जवानांनी तर नौदलातील 36 जवानांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे सशस्त्र दलातील जवानांची आत्महत्या थांबवण्यासाठी आणि त्यांचे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

दरवर्षी वर्दीतले 100 कर्मचारी आत्महत्येचा मार्ग निवडतात, हा मार्ग निवडण्याचं नेमक कारण काय ? तर ताण,तणाव आणि स्ट्रेस तर हा ताण-तणाव कशामुळे येतो, पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर असणारा तणाव, सैनिकांची मानसिक आणि शारिरीक स्थिती या गोष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना सुट्टी न मिळाल्याने अनेक दिवस घरी जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या तणावात वाढच होते. तसेच वैवाहिक समस्या आणि कुटुंबातील संपत्तीचे वाद असे अनेक कारणेही त्यामागे आहेत त्यामुळे त्यांना स्ट्रेस मॅनेजमेन्ट सेशन, काऊन्सेलिंग आणि इतर महत्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन करण्याचं गरजेच आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live