नागरिकांनो सावधान ; घरगुती गैस मधून निघाले तब्बल 1 ते दीड लीटर पाणी

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 11 मे 2021

आता चक्क घरगुती गॅस सिलींडरमध्ये गॅस नव्हे तर निघते पाणी हे ऐकून अवाक होण्याची गरज नाही मात्र हे खरे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे गॅस सिलिंडरमध्ये गॅसऐवजी चक्क पाणी भरले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भंडारा : आता चक्क घरगुती गॅस सिलींडरमध्ये Gas Cylinder गॅस नव्हे तर निघते पाणी हे ऐकून अवाक होण्याची गरज नाही मात्र हे खरे आहे. भंडारा Bhandara  जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे गॅस सिलिंडरमध्ये गॅसऐवजी चक्क पाणी भरले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Shocking ; Water instead of Gas in the Gas Cylinder

त्यामुळे गॅसचा वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये Customers एकच खळबळ माजली आहे. आधीच टाळेबंदी Lockdown असल्याने अत्यावश्यक Essential गरज असलेल्या गॅसमध्ये पाणी Water सापडत असल्याने यामुळे नागरिकांनी जगायचे तरी कसे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरच आता प्रत्येक ठिकाणी लूट आणि फसवणूक चालल्याचे चित्र कोरोना काळात पाहावयास मिळत आहे. 

हे देखील पहा -

दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असणारा गॅस सिलिंडर दिवसेंदिवस महाग होत असताना आता त्यातून पाणी निघण्याची घटना भंडारा जिल्ह्यात समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी जेवनाळा येथील अरविंद हेमने हे एच.पी कंपनीचे ग्राहक आहेत, यांनी  श्री गुरुकृपा गॅस एजन्सी पालांदुर येथून घरगुती गॅस सिलेंडरची खरेदी केली.  त्यांनी त्याचा घरी उपयोग सुरू केला परंतु काही दिवसातच सिलिंडर मधून गॅस संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. Shocking ; Water instead of Gas in the Gas Cylinder

अरविंद यांनी सिलिंडर हलवून बघितले तर त्यातून पाणी असल्याचे समजले नंतर त्यांनी त्यातील एक लिटर पेक्षा जास्त पाणी बाहेर काढले तरीही त्यात पुन्हा पाणी शिल्लक होतेच. 

जतमध्ये अवैध विदेशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

दाल मे कुछ काला है ही म्हण सर्वांना माहीतच मात्र आता सिलिंडरमध्ये पाणी आहे, अशी म्हण म्हणण्याची वेळ आता भंडारा जिल्ह्यातील गॅस सिलिंडर ग्राहकांवर आली आहे. याप्रकरणी अरविंद हेमने  हे  आता गॅस कंपनी विरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल करणार आहेत. Shocking ; Water instead of Gas in the Gas Cylinder

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live