व्यापारी शहर उल्हासनगरात अखेर दुकानं उघडली...

अजय दुधाणे
बुधवार, 2 जून 2021

उल्हासनगर : व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात अखेर सर्व दुकाने सुरू झाली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या आदेशांनुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत ही दुकाने आता सुरू राहणार आहेत. मात्र, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी ही वेळ सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनी केली आहे.

उल्हासनगर : व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या उल्हासनगर Ulhasnagar शहरात अखेर सर्व दुकाने सुरू झाली आहे. ठाण्याच्या Thane जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नव्या आदेशांनुसार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत ही दुकाने आता सुरू राहणार आहेत. The shop finally opened in Ulhasnagar

मात्र, व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी ही वेळ सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनी केली आहे. उल्हासनगर शहरात City जीन्स, साड्या, कपडे तसेच फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, बेकरी प्रोडक्टस यांची मोठी बाजारपेठ असून शहरात अनेक गोष्टींची निर्मितीही केली जाते.

Maharashtra: कोरोना रुग्णांसाठी दिलासा; उपचारासाठी नवे दर जाहीर

लॉकडाऊनमुळे Lockdown सतत धावणारं हे शहर काही दिवसांपासून ओस पडल्याचे चित्र होतं. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळपासून दुकानं उघडण्याची परवानगी दिल्यानंतर उल्हासनगरात पुन्हा एकदा गजबज सुरू झाली आहे. The shop finally opened in Ulhasnagar

हे देखील पहा 

यावेळी दुकानं उघडण्याचा आनंद असला, तरी सकाळी ७ ते २ ही वेळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यासाठी सोयीस्कर नसून ही वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी करण्याची मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी कोरोनाचे Corona नियम पाळण्याचं आवाहन करतानाच व्यापाऱ्यांचं प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी सुद्धा चक्रवर्ती यांनी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live