मुंबईत एक दिवसाआड दुकानं बंद  

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 19 मार्च 2020

मुंबईत गर्दी कमी होत नसल्याने थेट ५० टक्के दुकाने आता एक दिवसाआड बंद ठेवण्यात येणार आहेत.करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरची गर्दी कमी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी तातडीची पावले उचलली जात आहेत.

मुंबई: सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने एक दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गर्दीची ठिकाणे आणि गजबजलेल्या परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात दादर, माहीम, धारावी या भागातील केमिस्ट आणि अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने एक दिवसाआड बंद राहाणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार

 

धारावी

९० फूट रोड (पश्चिम बाजू-६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग)
आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)
महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू)

माहीम

टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल)
लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)

दादर

न. चि. केळकर मार्ग (पूर्व बाजू)
डिसिल्व्हा रोड
छबिलदास रोड
एस. के. बोले मार्ग (दक्षिण बाजू)
सेनापती बापट रोड (कोहिनूर इन्स्टिट्यूट ते हाॅकर्स प्लाझा)

 

मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार

 

धारावी

९० फूट रोड (पश्चिम बाजू-६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग)
आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू)

 

माहीम

टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल)
लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)

 

दादर

न. चिं. केळकर मार्ग (पश्चिम बाजू)
मो. चि. जावळे मार्ग (भवानी शंकर रोड पालिका शाळेपर्यंत)
रानडे रोड
एस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)

 

WebTittle ::  Shops closed one day in Mumbai


  


संबंधित बातम्या

Saam TV Live