देशभरात आजपासून दुकाने उघडणार, आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्राचं पाऊल

साम टीव्ही
शनिवार, 25 एप्रिल 2020

केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिलीय..यामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय

केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्राने परवानगी दिलीय..यामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय..आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे.  यावेळी शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास  परवानगी देण्यात आलेली नाही.

मात्र मुंबई MMR, पुण्यासह कोरोनाचे हॉटस्पॉट असलेली ठिकाणं. आणि रेड झोनमधील भागांना. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव वगळण्यात आलंय. या मुंबई,नागपूर, पुण्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने. या परिसरांमध्ये ल़ॉकडाऊनमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणेच, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. केंद्र सरकारने दुकाने उघडण्याची सवलत देताना काही अटी घातल्या आहेत..दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे, तसेच मास्क आणि हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असंही यात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांनी कोणत्याही दुकानांमध्ये गर्दी करू नये, सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं असं आवाहन साम टीव्हीही तुम्हाला करतंय.

देशभरात कोरोनामुळे 775 लोकांचा मृत्यू  झाला असून कोरोनाबाधितांचा आकडा 24 हजार 506 वर पोहोचलाय...सध्या देशात 18 हजार 668 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 5063 जण पूर्णपणे बरे झालेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय .दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून इथला मृतांचा आकडा 301वर पोहोचलाय.गुजरातेत 2624 रुग्ण आढळले असून तिथे आतापर्यंत 112 जण दगावलेत.. मध्य प्रदेशात मृतांची संख्या 83 इतकी झालीय...तर  दिल्लीत 50, तेलंगणात 26, उत्तर प्रदेशात 24 लोकांचा बळी गेलाय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live