कोणी लस देता का लस ? असे म्हणत गोंदियात नागरिकांची लसीसाठी भटकंती

अभिजीत घोरमारे
मंगळवार, 4 मे 2021

गोंदिया जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात आहे. यासाठी पाच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिक त्या ठिकाणी लसीकरणासाठी जात आहेत. मात्र त्या ठिकाणी गेल्यावर, लस नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. 

गोंदिया: केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाने १ मे पासून सर्वत्र लसीकरण Vaccination चालू झाले आहे. तसेच गोंदिया Gondia जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांनचे लसीकरण केले जात आहे. यासाठी पाच ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून शेड्यूल दिले जात आहे.Shortage of corona vaccine doses in Gondia District 

यानंतर मोबाईलवर लसीकरणाचे ठिकाण, दिवस, वेळ आदींची माहिती येते. त्यानंतर नागरिक त्या ठिकाणी लसीकरणासाठी जात आहेत. मात्र त्या ठिकाणी गेल्यावर, लस नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविले जात आहे. 

हे देखील पहा -

चार दिवसांपासून अनेक जण लस न घेताच केंद्रावरून Covid Center माघारी परत जात आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू असल्याचे चित्र गोंदियात दिसून येत आहे. 'लस देता का लस' अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर ओढवली आहे. आतापर्यंत फक्त १८ वर्षावरील  ६८२ जणांनाच फक्त लस देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरीक तुफान गर्दी करीत आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे. 

नागपुरातील MBBS चे इंटर्न्स डॉक्टर संपावर .... ( पहा व्हिडीओ )

१८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी राज्य सरकारकडून ५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे डोस केवळ १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठीच आहेत. मग डोस उपलब्ध असूनसुद्धा नागरिकांना केंद्रावरून का परत पाठविले जात आहे, हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे असे म्हणावे लागेल !

आतापर्यत गोंदियात जिल्ह्यात झालेले कोरोना लसीकरण:

- ६० वर्षावरील नागरीकांना 
  पहीला डोसः ५९००२
  दुसरा डोसः ७८१०
- ४५ ते ६० वर्षामधील नागरीकांना       
   पहीला डोसः ५४०३६ नागरीकांना
    दुसरा डोस: ६०२३
- १८ ते ४५ वर्षामधील नागरीकांना 
   पहीला डोस : ६८२ नागरीकांना फक्त

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यत झालेले एकूण लसीकरण- १६४५८९
फंटलाईन वर्कर साठी, 
पहीला डोसः २८३३१
दुसरा डोस: १३८८१

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live