भारतातील कोविड १९ लसीचा तुटवडा जुलै पर्यंत कायम राहील : आदर पुनावाला 

adar poonawalla
adar poonawalla

नवी दिल्ली : कोरोना Corona या रोगावरील लसींचा तुटवडा असताना दररोज ३ लाख कोविडचे सापडणारे रुग्ण, आणि मृत्यूमुखी पडणार्‍या रुग्णांचा भारत सामना करत आहे. असे असताना, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे Serum Institute of India (एसआयआय) प्रमुख आदर पूनावाला Adar Poonawala म्हणाले की, देशातील लसींच्या डोसची कमतरता पुढील महिन्या पर्यंत कायम राहील. The shortage of Covid 19 vaccine in India will continue till July says Adar Poonawala

फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, आदर पूनावाला असे म्हटले आहे की, भारतात कोविड -१९ लसीची कमतरता जुलैपर्यंत कायम राहील. जुलैमध्ये कोविड -१९ लसींचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे' असे पूनावाला म्हणाले आहेत. कोविड -१९ लसींचे उत्पादन जुलै महिन्यात सुमारे ४० ते ६० दशलक्ष डोस ते सुमारे १०० दशलक्ष Million डोस पर्यंत वाढेल.  1 मे पासून भारताने सर्व प्रौढांसाठी लसीकरण सुरू केल्याच्या काही दिवसानंतर अदार पूनावाला यांचे हे विधान आहे.

पूनावाला म्हणाले की, कोविड -१९ प्रकरणे कमी होण्यास सुरुवात झाली होती. आम्हाला जानेवारीत कोरोनाव्हायरस आजाराच्या दुसर्‍या लाटेचा फटका बसण्याची अधिका अपेक्षा नव्हती. “प्रत्येकाला खरोखरच असे वाटले होते की भारताने कोरोनाच्या साथीच्या आजार संपवण्याची तयारी सुरू केली आहे.” The shortage of Covid 19 vaccine in India will continue till July says Adar Poonawala

पुढे ते म्हणाले की, जर आम्हाला ऑर्डर आले असते तर, त्यांच्या कंपनीने उत्पादन वाढविले असते. " आम्हाला कोणतेही आदेश नव्हते, आम्हाला वर्षाला 1 अब्जपेक्षा Billion जास्त डोस देण्याची गरज वाटत नव्हती," असं आदर पूनावाला पुढे म्हणाले.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com