कोरोनात साहित्य संमेलन आयोजित करावं का?

साम टीव्ही
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

नाशिकमध्ये होणारं मराठी साहित्य संमेलन महिन्यावर येऊन ठेपलंय. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं हे संमेलन आयोजित करावं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. 

नाशिकमध्ये होणारं मराठी साहित्य संमेलन महिन्यावर येऊन ठेपलंय. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं हे संमेलन आयोजित करावं की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. 

९४वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देवभूमी नाशिकमध्ये होतंय. साहित्य संमेलन महिनाभरावर असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना कोरोना झालाय. त्यामुळं साहित्य संमेलन आयोजित करावं का असा प्रश्न निर्माण झालाय. आयोजक मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

कोरोनामुळं साहित्य उत्सवाचा आनंद घेता येणार नाही असं सामान्य नाशिककरांना वाटतंय. त्यामुळं संमेलन पुढं ढकलण्याची मागणी होतेय.

संमेलन पुढं ढकलण्याची वेळ आली तरी याच वर्षी संमेलन घ्यायचं असा मानस आयोजकांचा आहे. पण संमेलनाच्या आयोजनामुळं साहित्यिक आणि साहित्यरसिक हे कोरोनापासून सुरक्षित राहावेत एवढीच माफक अपेक्षा . 
 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live