साम इम्पॅक्ट- 'त्या' बियाणे विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस

जयेश गावंडे
शुक्रवार, 4 जून 2021

सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती.

सोयाबीन बियाण्यांबाबत गतवर्षीपासून वाद सुरू आहेत. उगवण क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार गतवर्षी उघडकीस आल्याने अनेक कंपन्यांवर कारवाईही झाली होती. त्यातून यावर्षी कंपन्या व बियाणे विक्रेत्यांनी अजब पळवाट काढून बियाणे विकणार, पण जबाबदारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. थेट बियाणे विक्रीच्या देयकावरच शिक्का मारून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न विक्रेते करीत आहेत.  ही बातमी काल साम टीव्ही वर दाखवन्यात आली होती. (Show cause notice to seed sellers)

दरम्यान, साम टिव्हीच्या बातमीची दखल घेत कृषी विभागाने अशा प्रकारचे शिक्के मारणाऱ्या बियाणे विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. नोटीस मधून कारवाईचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.  सध्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असून त्यातही काही कृषी केंद्र चालक सोयाबीन बियाण्यांच्या जबाबदारीतून बाहेर निघण्याचा प्रकार करत आहेत.

हे देखील पाहा 

बियाणे खरेदी केलेल्या बिलावर बियाणे विक्रेते ‘सदर सोयाबीन बियाणे मी झाल्या जबाबदारीवर घेत आहे. तसेच याची उगवण क्षमता मी पेरणी करण्यापूर्वी तपासून घेईल’, असा शिक्का मारल्याचा प्रकार तेल्हारा तालुक्यात घडला आहे.  हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी बियाणे मारून त्याची कोणतीही जबाबदारी न घेण्यासारखा आहे. 

सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर घेत आहे..! विक्रेत्यांचा अजब फतवा

यातून उद्या जर बियाणे उगवलेच नाही आणि विकत घेतलेले बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करावी, हा प्रश्नच आहे. बियाणे विकत घेणारा शेतकरीच यात फसवल्या जाण्याची भिती अधिक आहे. बियाण्यांची जबाबदारी संबधित कंपनीसोबतच विक्रेत्यांवरही समप्रमाणात राहिल्यास बोगस बियाणे विक्रीला आळा बसतो. मात्र, आता विक्रेत व बियाणे कंपनीच देयकांवर शिक्के मारून जबाबदारी झटकत असेल तर अशा व्यवहारात शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या गेल्यास शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी कुणाचे द्वार ठोठवावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आता साम टीव्हीच्या बातमीची दखल घेताच अखेर बियाणे विकर्त्याना नोटीस देण्यात आली आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live