Corona Update: शेगावनंतर अक्कलकोटचे 'देऊळ बंद'!

Akkalkot
Akkalkot

अक्कलकोट : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. यामुळे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांना निर्देश दिले आहेत. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी स्वामींचे मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं मंदिर सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद करण्यात आलं आहे. Shri Swami Samarth Temple of Akkalkot is completely closed for devotees

पुढील आदेश येईपर्यंत स्वामींचं मंदिर भक्तांसाठी बंदच राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी सर्व धार्मिक विधी, पूजा, आरती नियमितपणे करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली आहे.

शेगांवच्या संत गजानन महाराज मंदिर परिसरात शांतता

'मिशन ब्रेक द चेन' अभियान राबविण्यात येत असल्याने शेगांवमध्ये (Shegaon) सर्वत्र शांतता पसरली होती. एरवी 24 तास गजबजणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात रात्री आठ वाजताच शुकशुकाट पाहायला मिळाला. दर्शनासाठी आलेल्या स्थानिक भक्तांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळूनच दर्शन घेतले. शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील भाविक मोठ्या संख्येत याठिकाणी येत असतात. त्यामुळे मंदिरात दररोज मोठी गर्दी होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मंदिर दुसऱ्यांदा बंद ठेवण्यात आले आहे.

पंढरपुरात जमावबंदी तरीही रस्त्यावर लोकांची गर्दी...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंगळवारपासून सोलापूर जिल्ह्यात दिवसभर जमाव बंदी, तर रात्रीच्या सुमारास संचार बंदी लागू करण्यात आली आहे. आजपासून कोरोनाचे कडक निर्बंध लागू झाले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी पंढरपूर शहरात निर्बंध झुगारून लोक रस्त्यावर फिरताना दिसत होते. इतर दुकाने बंद असली तरी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. अजूनही लोक कोरोनाबाबत बेफिकीर असल्याचे चित्र पंढरपूरमध्ये पाहायला मिळाले.

(Edited By - Digambar Jadhav)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com